March 31, 2023 5:50 pm

Maharashtra Corona Update 2701 Corona Patients Registered And 1327 Discharge In The State On Monday

मुंबई : राज्यात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत आहे. दिवसाला 800 – 900 असे आढळणारे रुग्ण आता हजारांच्या घरात पोहोचले आहेत. गेल्या दोन दिवसापासून हाच आकडा हजारापेक्षा  जास्त आहे. तर आज राज्यातील  कोरोना रुग्णसंख्येने गेल्या दोन महिन्यातील उच्चांक गाठला आहे. बुधवारी राज्याच तब्बल 2 हजार 701  रुग्ण आढळून आले आहेत.  तर मुंबईत 1765 रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईकरांसाठी हि चिंतेची बाब  आहे.

मुंबईकरांची चिंता वाढली

आज राज्यात 2701 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर 1327 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सर्वाधिक रुग्ण हे मुंबई शहरातील असून मुंबईत आज 1765  रुग्णांची नोंद झाली आहे.  राज्यात आज कोरोनाच्या शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. 

आज शून्य कोरोना मृत्यूची नोंद

राज्यात आज एकूण 1327 रुग्ण बरे होऊन घरी परतले असून आतापर्यंत एकूण 77,41, 143  जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 98.02 टक्के इतकं झालं आहे. राज्यात आज शून्य कोरोना मृत्यूची नोंद झाली असून मृत्यूदर हा 1.87 टक्के इतका झाला आहे. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णाांची एकूण संख्या 78, 98, 815 इतकी झाली आहे.

सक्रिय रुग्णसंख्या वाढली

राज्यातील कोरोनाची सक्रिय रुग्णसंख्या देखील वाढताना दिसत आहे. राज्यात आज एकूण 9806 सक्रिय रुग्ण आढळले असून मुंबईत सर्वाधिक म्हणजे 7000 इतक्या सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्या खालेखाल ठाण्याचा क्रमांक लागत असून ठाण्यामध्ये 1482  इतके सक्रिय रुग्ण आढळतात. 

 देशात 5233 नवे कोरोनाबाधित

 गेल्या 24 तासांत कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मंगळवारी दिवसभरात देशात पाच हजार 233 नवीन रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. ही मागील तीन महिन्यांतील सर्वाधिक रुग्ण वाढ आहे. मार्चनंतर सर्वाधिक कोरोना रुग्ण सापडले आहेत. तर देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 28 हजारांवर पोहोचली आहे. देशात सध्या 28 हजार 857 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.

Source link

50% LikesVS
50% Dislikes
Facebook
Twitter
LinkedIn
Telegram

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisement

Radio

Panchang

Corona Update

Live Cricket Score

Stock Market

Related Posts

Click here to download our APP