



मुंबई : सांस्कृतिक कलादर्पण (Kala Darpan Purskar) पुरस्कारांमध्ये एबीपी माझा (ABP Majha) सर्वोकृष्ट वृत्तवाहिनी ठरलीय. माझाचे संपादक राजीव खांडेकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या सोहळ्यात एबीपी माझाला मानाच्या तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. सर्वोत्कृष्ट वृत्तनिवेदिका म्हणून माझाच्या वृत्तनिवेदिका ज्ञानदा कदम यांचा गौरव करण्यात आला. तर सर्वोत्कृष्ट वृत्त वार्ताहर म्हणून माझाच्या प्रतिनिधी राखी शेळके यांना गौरवण्यात आलं.
मुंबईत बोरीवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात रंगलेल्या रंगारंग कार्यक्रमात काल या पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. एबीपी माझानं त्यात तीन महत्त्वाच्या पुरस्कारांवर नाव कोरून दर्जेदार आणि लोकप्रिय वृत्तवाहिनी हा लौकिक पुन्हा एकदा सार्थ ठरवला.
सांस्कृतिक कला दर्पण पुरस्कार सोहळ्याचे मानकरी
- सर्वोत्कृष्ट चित्रपट – माई घाट
सर्वोत्कृष्ट अभिनेता
- अंकुश चौधरी – (ट्रीपल सीट )
- संदीप पाठक (राख )
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
- उषा जाधव ( माई घाट)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक
- अनंत महादेवन ( माई घाट)
सर्वोत्कृष्ट नाटक
सर्वोत्कृष्ट अभिनेता नाटक
- मंगेश कदम ( आमने सामने )
- वैभव मांगले ( इबलिस )
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
- समिधा गुरु ( थोडं तुझं थोडं माझं )
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक
- नीरज शिरवईकर ( थोडं तुझं थोडं माझं)
सर्वश्रेष्ठ कलागौरव पुरस्कार
1. उषा नाडकर्णी
2. डॅा. विलास उजवणे
संबंधित बातम्या :
Devarshi Narad Journalism Award : ज्ञानदा कदम यांना देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार
